Posts

Showing posts from October, 2019

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल? संजय पाठक, नाशिक : तो एक काळ होता. शहरी भागातील सर्व मतदार अक्षरश: भारावले होते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्येष्ठांच्या बरोबरच किशोरवयीन आणि शाळकरी मुलांचा सुद्धा पॅशन बनला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी साद घालावी आणि त्याला प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून तर मिळायचाच परंतु त्याला जनभावनेची साथदेखील असायची. परंतु २०१४ नंतर सारे राजकारण बदलले. पारंपरिक राजकारणाचे आयाम बदले. मनसेची ताकद क्षीण होत गेली आणि पुन्हा राज यांची राजकीय भूमिकादेखील बदलत गेली. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधात बोलणारे राज हे त्यांच्याच वळचणीला बसले, अशी टीका होऊ लागली. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नाही परंतु लोकसभेच्या प्रचारात मोदी आणि शहा यांच्या विरोधातील मैदान मात्र राज यांनी गाजवले, परंतु नंतर त्याचा उपयोग न झाल्याने स्वत:च राज निराश झाल्याचे सांगितले जात असून विधानसभा निवडणुकीच्या  रणांगणात उतरायचे की नाही, याबाबत ते निर्णय घेण्यास तयार नाही. आता कुठे ते लढण्याच्या मानसिकतेत आल्याचे सूत्रांनी सांगितले असले तरी गेल्या २००९ ते २०१९ या...

नाशकात शिवसेनेची अवस्था बिकट, आमची कोठेही शाखा नाही म्हणण्याची वेळ

नाशकात शिवसेनेची अवस्था बिकट, आमची कोठेही शाखा नाही म्हणण्याची वेळ संजय पाठक, नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरीस युतीने अधिकृतरीत्या घोषणा न करताच थेट उमेदवाºया घोषित केल्या आहेत. बंडाळी टाळण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने कोणता मतदारसंघ कोणाला सोडला हे जाहीर केले नसले तरी थेट उमेदवारी घोषित करण्यामुळे नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाने आपल्या ताब्यातच ठेवले आहेत. त्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झाली असून जर चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाला जाणार असतील तर भविष्यात नाशिक शहरात आमची कोठेही शाखा नाही असे फलक लावावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात शिवसैनिकांच्या भावना काहीही असल्या आणि भाजपावर रोष व्यक्त होत असला तरी मुळातच शिवसेना नेतृत्वाने नमते घेतल्याचाच हा परिणाम आहे. तर भाजपाची दूरदृष्टीदेखील यास कारणीभूत असून, भविष्यात महापालिकांवर कब्जा करण्यासाठी ही खेळी उपयुक्त ठरणार आहे.    विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवे...

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?  संजय पाठक, नाशिक- नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार (राजीनामा दिल्याने आता माजी) बाळासाहेब सानप हे खरे तर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उजवा हात. महाजन यांच्यापर्यंत पोहोचायचे असेल तर सानप हे महत्त्वाचे तद्वतच पालकमंत्र्यांना काहीही निर्णय घ्यायचा तर त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक विश्वासू म्हणजेच बाळासाहेब सानप अशी अवस्था होती. मात्र, दीड-दोनवर्षांपूर्वी हे चित्र बदलले, सानप यांच्याविरोधातील तक्रारी वाढल्या आणि त्याची परिणीती सानप यांना उमेदवारी डावलण्यात झाली. हे खरे असले तरी त्याचे पडसाद ज्या पद्धतीने पडलेत हे अधिक धक्कादायक झाले. यशोशिखरावर असलेल्या आणि मंत्रिपदाचे दावेदार ठरणाºया सानप यांच्या घेतले गेलेल्या निर्णयामागे नक्की काय घडलं, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.       राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतात हे खरे असले तरी भाजपात केवळ उमेदवारी करण्याच्या दरम्यान, जे दोन ते तीन दिवस घडत होते ते कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे ठरले. नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत....

राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला ! संजय पाठक, नाशिक- ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढावायची त्या बिनीच्या शिलेदाराने शस्त्र गहाण टाकावी किंवा अगोदरच शत्रुपक्षाला जाऊन मिळावे अशी अवस्था नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्याबाबतीत झाली आहे. एकीकडे पक्षाकडे पुरसे उमेदवार नाही, त्यामुळे अन्य पक्षांकडील नाकारलेले स्वीकारण्याची वेळ आणि दुसरीकडे मात्र पक्षात ज्यांना सर्वेसर्वा केले त्यांनीच पळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. ज्या जिल्ह्यात पंधरा जागा लढवायची राज यांनी तयारी केली त्या जिल्ह्यात पंधरा पैकी पाच जागांवर उमेदवार मिळाले. त्यामुळे एकंदरच राज यांच्या नाशिकमधील करिष्मा कमी झाला की काय अशीच शंका निर्माण झाली आहे.          विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले. त्यातील पाच जण आगंतूक आहेत. उर्वरित जागांना अन्य पक्षांतील उमेदवारदेखील मिळाले नाहीत.    मनसे स्थापन करताना राज यांना सर्वाधिक साथ नाशिककरांनी दिली होती. राज यांच्या संपर्कातील शिवसेनेतील अन...

मनसेच्या माजी महापौरांनी माघार घेतल्याने राज यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा

मनसेच्या माजी महापौरांनी माघार घेतल्याने राज यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा संजय पाठक, नाशिक : राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे विरोधकांत सामील होण्याचे टाळले असले तरी त्यांचा कल राष्टÑवादीच्या बाजूनेच असल्याचे दिसते आहे. पुण्याकडे कोथरूड मतदारसंघात भाजपच्या विरोधात मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याची जी खेळी खेळली गेली तशी नाशिकमध्ये दोन ते तीन मतदारसंघात करण्याची संधीदेखील होती. मात्र, केवळ नाशिक पूर्व मतदार संघातूनच ती यशस्वी करण्यात आली. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी निवडणूक लढविण्याची आपली तयारीच नसल्याचे सांगत माघार घेतली, त्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या माघारीपेक्षा राज ठाकरे यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा जास्त होत आहे.     राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.  त्यामुळे मनसे कोणाशी फक्त सार्वत्रिक निवडणुकीत युती करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचे कारण म्हणजे २००९ मध्ये झालेल्या विधानसभा नि...

भाजपाच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरीष्ठ नेत्यांचाच आाशिर्वाद?

भाजपाच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरीष्ठ नेत्यांचाच आाशिर्वाद? संजय पाठक, नाशिक : शिवसेनेचे नेते संजय राऊन यांनी नाशिकमध्ये येऊन भाजपाच्या उमेदवाराविरोधात  बंडखोरी करणाºयांना थोपविण्याचा प्रयत्न केला आणि दुसºयाच दिवशी राष्टÑवादीच्या उमेदवाराला भेटून बंद खोली आड चर्चा देखील केली त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांच्या विषयी पक्षातील बंडखोरांना नक्की काय संदेश जाणार? नाशिकच्या पश्चिम मतदार संघातील बंडखोरांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर राऊत यांनी त्यांच्या समोर हात टेकले आणि आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा विषय सोपविला असे सांगितले जात असले तरी उत्तर महाराष्टÑाच्या संपर्क प्रमुखाला नगरसेवक जुमानत नाही यावर कोणाचा विश्वास बसणार नाही त्यामुळेच जे घडते त्यामागे सेनेच्या वरीष्ठांचाच आशिर्वाद तर नव्हे अशी देखील शंका निर्माण झाली आहे.         नाशिक पश्चिम मधून युतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या मतदार संघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने हा मतदार मिळालाच पाहिजे यासाठी ह...

दहा रूपयांत थाळी शक्य, की अशक्य? झूनका भाकर योजनेची पुनरावृत्ती होणार?

दहा रूपयांत थाळी शक्य, की  अशक्य? झूनका भाकर योजनेची पुनरावृत्ती होणार? संजय पाठक, नाशिक- विधान सभा निवडणूकीत शिवसेनेच्या वतीने मतांची बेगमी करण्यासाठी दहा रूपयांत थाळी देण्याची घोेषणा केली आणि त्यामुळे ‘गरीब की थाली में पुलाव आया है, लगता है फिर चुनाव आया है...’ अशी चर्चा सुरू झाली. अर्थात, अल्प दरात भोजनाची घोषणा आत्ता चर्चेत आली असली तरी  देशांत यापूर्वी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. तथापि, वाढत्या महागाई मुळे दहा रूपयांत थाळी शक्य आहे की अशक्य याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेषत: दहा रूपयांत खरोखरीच थाळी परवडू शकेल काय याबाबत मतभिन्नता आहे. शासनाने अनुदान दिले आणि सेंट्रल किचनसारख्या एकाच ठिंकाणावरून नियोजन केले तर ही योजना आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरू शकते, असे देखील जाणकारांचे मत आहे. अन्यथा युती सरकारच्या काळातीलच झूनका भाकर योजनेची पुनरावृत्ती होऊ शकते.       निवडणूकांच्या तोंडावर लोकानुनय करणाºया सवंग घोषणा केल्या जातात. त्या करताना त्यावेळी आर्थिक गणिताबाबत फारसा विचार केला जात नाही, मात्र नंतर याच योजना राबविताना अडचणी येतात, मग घोटाळे सुरू होतात...

नंबर गेमसाठी उत्तर महाराष्ट्रातच युतीतच शह काटशहचे राजकारण

नंबर गेमसाठी उत्तर महाराष्ट्रातच युतीतच शह काटशहचे राजकारण ३५ पैकी दहा जागांवर बंडखोरी सेना- भाजपाकडून बंडखोरांवर कारवाई नाही संजय पाठक, नाशिक-  भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर देखील उभय पक्षात एकमेकाला शह- काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक शहरातील ३६ नगरसेवक आणि साडे तीनशे पदाधिकाºयांनी थेट राजीनामे दिल्याने शिवसेनेचे भाजपाच्या विरोधात बंड केल्याचे राज्यभर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, भाजपचेच अनेक ठिकाणी बंडखोर उभे असून त्यामुळेच शिवसेनेने हे धाडस केल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्टÑात ३५ पैकी दहा जागांवर बंड असून त्यामुळे युतीचा ‘सामना’ कॉँग्रेस- राष्टÑवादीपेक्षा आपसातच होताना दिसत आहे.          यंंदाच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजपाकडे इच्छूकांची प्रचंड संख्या होती. कोणत्याही पक्षाची जागा बदलली गेली असती तर मित्रपक्षातील इच्छुकाकडून बंड अटळच होते. त्यामुळे युतीची घोषणा न करताना भाजपा आणि शिवसेनेकडून थेट ए- बी फॉर्मचे वाटप करण्यात आले.  परंतु त्यामुळे  बंडखोरी टाळता आली नाही. या निवडणूकीत भाजपाच्या वाटेला १६४ जागा आल्या असू...

महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक

महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक * मनपातील हस्तक्षेप हा वादाचा मुद्दा * सानप यांच्या उमेदवारीला हाच बसला फटका संजय पाठक, नाशिक : शहरातील चारही विधानसभा निवडणुकीत अखेर युतीने बाजी मारली आहे. यातील देवळालीची जागा सोडली तर बहुतांशी ठिकाणी महापालिकेशी संबंधित अनेक विषय होतेच परंतु महापालिकेतील हस्तक्षेप आणि वादाची झालरदेखील होती. विशेषत: नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेतील हस्तक्षेप या एकमेव कारणावरून बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारलीच शिवाय अन्य उमेदवारांच्या भोवतीदेखील महापालिकेतील वादाचे राजकारणच फिरले.    नाशिक महापालिकेचे महापौरपद भूषविल्यानंतर नाशिकच्या आमदारकीची स्वप्ने पाहण्यास १९९२ पासून सुरुवात झाली. पहिल्या पंचवार्षिकमध्ये प्रथम महापौर झालेले शांताराम बापू वावरे यांनी नंतर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. शिवाय त्याचवेळी कॉँग्रेसचे (कै.) पंडितराव खैरे, युती पुरस्कृत अपक्ष अ‍ॅड. उत्तमराव ढिकले आणि कॉँग्रेसचे प्रकाश मते यांची नावे आमदारकीसाठी घेतली जात हाती. त्यातील ढिकले यांनी पुढे आमदारकी भूषविलीच. त्यावेळी नाशिक आणि नाशिकरोड दे...