भाजपाच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरीष्ठ नेत्यांचाच आाशिर्वाद?

भाजपाच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरीष्ठ नेत्यांचाच आाशिर्वाद?


संजय पाठक, नाशिक : शिवसेनेचे नेते संजय राऊन यांनी नाशिकमध्ये येऊन भाजपाच्या उमेदवाराविरोधात  बंडखोरी करणाºयांना थोपविण्याचा प्रयत्न केला आणि दुसºयाच दिवशी राष्टÑवादीच्या उमेदवाराला भेटून बंद खोली आड चर्चा देखील केली त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांच्या विषयी पक्षातील बंडखोरांना नक्की काय संदेश जाणार? नाशिकच्या पश्चिम मतदार संघातील बंडखोरांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर राऊत यांनी त्यांच्या समोर हात टेकले आणि आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा विषय सोपविला असे सांगितले जात असले तरी उत्तर महाराष्टÑाच्या संपर्क प्रमुखाला नगरसेवक जुमानत नाही यावर कोणाचा विश्वास बसणार नाही त्यामुळेच जे घडते त्यामागे सेनेच्या वरीष्ठांचाच आशिर्वाद तर नव्हे अशी देखील शंका निर्माण झाली आहे.
        नाशिक पश्चिम मधून युतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या मतदार संघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने हा मतदार मिळालाच पाहिजे यासाठी हटून बसलेल्या शिवसैनिकांनी बंड पुकरले आणि विलास शिंदे यांना उभे केले. सध्याच्या त्यांच्या प्रचारात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार असे लिहीले जात असून त्यांच्या प्रचार साहित्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून स्थानिक नेत्यापर्यंत सर्वांच्याच छबी आहेत. त्यानंतर या बंडखोरांना शमविण्यासाठी भाजपाचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी गुरूवारी (दि.१०) नाशिक मुक्कामी असलेल्या खासदार संजय राऊत यांना साकडे घातले. त्यासाठी पूर्वाश्रमी शिवसैनिक आणि सध्या भाजपात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल आणि वसंत गिते यांना दुत म्हणून धाडले. त्यांच्या तक्रारींची दखल घेत खासदारांनी तत्काळ शिवसेनेचे नगरसेवक आणि बंडखोर विलास शिंदे यांची बैठक घेतली खरी परंतु त्यांनीच पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले त्यमाळे राऊत यांना नाईलाज झाला आणि त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडेच हा विषय सोपविला. शिवसेनेची एवढी मवाळ भाषा प्रथमच दिसत आहे. त्यामुळेच एरव्ही आदेश म्हणजे आदेश म्हणणारा शिवसैनिक आदेश जुमानणार नाही म्हणतो तेव्हा एकतर तो पक्षाच्या आदेशाने खोटे बोलतो किंवा पक्षाने काढून टाकले तरी बेहत्तर या निर्वाणीच्या भूमिकेत आलेला दिसते.
     नाशिक पश्चिम मध्ये शिवसेनेचा एक बंडखोर नाही तर त्याला पाठींबा देणारे २२ नगरसेवक बंडखोर आहेत. त्यांना काढण्याची हिम्मत शिवसेनेने करावी तर पुढिल महिन्यात लगोलग नाशिक महापालिकेत महापौरपदाची निवडणूक आहे. मुळातच नाशिक महापालिकेत भाजपाचे बहूमत आहे. विधान सभा निवडणूकीतील फाटाफूट पथ्यावर पाडून घेऊन सेनेला सत्ता संपादन करायचे आहे अशा स्थितीत आपल्या पक्षातील तब्बल २२ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यापेक्षा सेनेने शांत आणि सोयीची भूमिका घेण्याचे ठरवलेले दिसते. अर्थात, त्याचा परिणाम केवळ विधानसभेच्या निवडणूकीवरच नाही तर एकंदरच राजकारणारव होणार हे ही तितकेच खरे आहे. 

Comments