येस बॅँक: सव्वा तीनशे कोटी रूपयांचा घोळ नाशिक महापालिकेत कोणाला भोवणार? विधान परिषदेत गाजणार प्रश्न स्मार्ट सिटीने काढल्या ठेवी मग मनपाने का नाही? संजय पाठक, नाशिक- येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने राज्यभरातील महापालिकांबरोबरच अनेक निमशासकिय संस्थांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यावर आता बराच खल होणार असला तरी मुळातच अशाप्रकारचे खासगी बॅँकांमध्ये ते किती सुरक्षीत याचा विचार सरकारने केला ना संबंधीत संस्थांनी! एकट्या नाशिक महापालिकेचेच सव्वा तीनशे कोटी रूपये अडकले आहेत. खातेदार ते बिचारे बेहालच. आता या सर्व प्रकारांना जबाबदार कोण याचा देखील सोक्षमोक्ष होण्याची गरज आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी येस बॅँकेची व्यवहारांसाठी निवड केली आणि राष्टÑीयकृत बॅँकेतील खाती बंद करुन ती येस बँकेत सुरू केली. त्यावेळी खासगी बॅँकेत रकमा ठेवण्याची इतकी मोठी जोखीम पत्करणे योग्य आहे काय असा प्रश्नही निर्माण झाला होता. परंतु आता खासगी क्षेत्र मोठे आहे, याशिवाय राष्ट्रीयीकृत बॅँका ज्या सेवा देणार नाही त्या सेवा येस बॅँक देणा असे सांगण्यात आले. बॅँकेने ५५ हजा...