Posts

Showing posts from September, 2019

मखमलाबाद मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा, अन्य भागात काय?

मखमलाबाद मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा, अन्य भागात काय? नाशिक-  मखमलाबाद शिवारात अखेरीस ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प महासभेने मंजुर केला आहेत. राज्य शासनाला या प्रकल्पात स्वारस्य असल्याने त्यासाठी राजपत्रात घाईघाईने इरादा स्पष्ट केला आहे. प्रकल्प चांगला की वाईट, श्ेतकºयांचे भले होईल काय वगैरे मुद्दे बाजुला ठेवले तरी मुळातच अशाप्रकारचे प्रकल्प शहराच्या विशीष्ट भागात राबविण्याच्या मुळ हेतू विषयीच शंका निर्माण होत आहे. म्हणजेच मखमलाबादच्या ज्या एका भागात ही  योजना राबविली जाईल तेथे रस्ते, पाणी, लाईट सर्वच आंतरराष्टÑीय दर्जाच्या सुविधा दिल्या जातील मग उर्वरीत भागातील करदाते आणि नागरीकांना सामान्य दर्जाच्या सुविधा कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.    केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटी उपक्रम राबविला जात आहेत. मुळात स्मार्ट सिटी ही संकल्पना शाश्वत शहरे घडविण्यासाठी आहे. त्यात अनेक फरबदल होऊन स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येत आहेत. यातील उत्तम प्रकल्पांना कोणाचाही विरोध नसतो आणि विरोध असण्याचे कारण नाही. अगदी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात कं...