नाशिक शहरातील गणेश मंडळे हा काय कारवाईचा विषय आहे?
संजय पाठक, नाशिक - कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केला किंवा व्यवहारीकाता न पडताळता निर्णय घेतला की, त्याचे कटू परिणाम समोर येतात. नाशिक महापािलकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित बैठकीत नियमांच्या अतिरेकावरून कार्यकर्त्यांनी जो क्षोभ व्यक्त केला, तो याच सदरातील आहे. दरवर्षी गणेशोत्सव आला की महापालिका त्यावर चर्चा करते, त्याचवेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन उत्सव कसा शांततेत पार पाडता येईल यावर चर्चा करत असते. या बैठका अत्यंत औपचारीक ठरतात. विशेषत: दरवर्षी मिरवणूक मार्गावरील खडडे बुजवावे, लटकत्या तारा भूमिगत कराव्यात, मिरवणूका दुपारी सुरू कराव्यात, निर्माल्य कलश असावेत अशाप्रकारच्या नियमीत विषय आणि फार तर गणेश मंडळांना प्रयोजक असेल तर त्यांच्या जाहिरातींवरील कर माफ करावे यापलिकडे अशा बैठकांमधून फार काही पार पडत नाही. मात्र अलिकडच्या काळात निय...