Posts

Image
येस बॅँक: सव्वा तीनशे कोटी रूपयांचा घोळ नाशिक महापालिकेत कोणाला भोवणार? विधान परिषदेत गाजणार प्रश्न स्मार्ट सिटीने काढल्या ठेवी मग मनपाने का नाही? संजय पाठक, नाशिक-  येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने राज्यभरातील महापालिकांबरोबरच अनेक निमशासकिय संस्थांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यावर आता बराच खल होणार असला तरी मुळातच अशाप्रकारचे खासगी बॅँकांमध्ये ते किती सुरक्षीत याचा विचार सरकारने केला ना संबंधीत संस्थांनी! एकट्या नाशिक महापालिकेचेच सव्वा तीनशे कोटी रूपये अडकले आहेत. खातेदार ते बिचारे बेहालच. आता या सर्व प्रकारांना जबाबदार कोण याचा देखील सोक्षमोक्ष होण्याची गरज आहे.     पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी येस बॅँकेची व्यवहारांसाठी निवड केली आणि राष्टÑीयकृत बॅँकेतील खाती बंद करुन ती येस बँकेत सुरू केली. त्यावेळी खासगी बॅँकेत रकमा ठेवण्याची इतकी मोठी जोखीम पत्करणे योग्य आहे काय असा प्रश्नही निर्माण झाला होता. परंतु आता खासगी क्षेत्र मोठे आहे, याशिवाय राष्ट्रीयीकृत बॅँका ज्या सेवा देणार नाही त्या सेवा येस बॅँक देणा असे सांगण्यात आले. बॅँकेने ५५ हजा...
Image
उद्धव ठाकरे- छगन भुजबळ यांचे आदेश गांभीर्याने घेतले जातील? संजय पाठक, नाशिक : डोंबिवलीतील प्रदूषणकारी उद्योगांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेण्याची गरज असली तरी प्रत्यक्षात प्रशासन ते किती अंमलात आणते याविषयी शंकाच आहे. गोदावरीबाबत तर वारंवार शुद्धीकरणावर चर्चा होऊनही नदी प्रदूषणाबाबत केवळ चर्चाच होणार असेल तर आता तरी नदी प्रदूषणमुक्त कितपत होईल याविषयी प्रश्न पडावा अशीच स्थिती आहे. नद्यांचे प्रदूषण हा सर्वच शहरातील गंभीर विषय झाला आहे. डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ते गुलाबी झाल्याचे आढळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथे पाहणी केली. प्रदूषणकारी उद्योग बंद करता येत नसतील तर ताळे लावा, असे त्यांनी उद्योजकांनाच सुचवले. वास्तविक प्रदूषणाचे उद्योग थांबत नसतील तर कारवाई करणे मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये नमामि गोदा फाउंडेशनने आखलेल्या प्रबोधन कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी गोदावरीचे...

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल? संजय पाठक, नाशिक : तो एक काळ होता. शहरी भागातील सर्व मतदार अक्षरश: भारावले होते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्येष्ठांच्या बरोबरच किशोरवयीन आणि शाळकरी मुलांचा सुद्धा पॅशन बनला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी साद घालावी आणि त्याला प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून तर मिळायचाच परंतु त्याला जनभावनेची साथदेखील असायची. परंतु २०१४ नंतर सारे राजकारण बदलले. पारंपरिक राजकारणाचे आयाम बदले. मनसेची ताकद क्षीण होत गेली आणि पुन्हा राज यांची राजकीय भूमिकादेखील बदलत गेली. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधात बोलणारे राज हे त्यांच्याच वळचणीला बसले, अशी टीका होऊ लागली. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नाही परंतु लोकसभेच्या प्रचारात मोदी आणि शहा यांच्या विरोधातील मैदान मात्र राज यांनी गाजवले, परंतु नंतर त्याचा उपयोग न झाल्याने स्वत:च राज निराश झाल्याचे सांगितले जात असून विधानसभा निवडणुकीच्या  रणांगणात उतरायचे की नाही, याबाबत ते निर्णय घेण्यास तयार नाही. आता कुठे ते लढण्याच्या मानसिकतेत आल्याचे सूत्रांनी सांगितले असले तरी गेल्या २००९ ते २०१९ या...

नाशकात शिवसेनेची अवस्था बिकट, आमची कोठेही शाखा नाही म्हणण्याची वेळ

नाशकात शिवसेनेची अवस्था बिकट, आमची कोठेही शाखा नाही म्हणण्याची वेळ संजय पाठक, नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरीस युतीने अधिकृतरीत्या घोषणा न करताच थेट उमेदवाºया घोषित केल्या आहेत. बंडाळी टाळण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने कोणता मतदारसंघ कोणाला सोडला हे जाहीर केले नसले तरी थेट उमेदवारी घोषित करण्यामुळे नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाने आपल्या ताब्यातच ठेवले आहेत. त्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झाली असून जर चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाला जाणार असतील तर भविष्यात नाशिक शहरात आमची कोठेही शाखा नाही असे फलक लावावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात शिवसैनिकांच्या भावना काहीही असल्या आणि भाजपावर रोष व्यक्त होत असला तरी मुळातच शिवसेना नेतृत्वाने नमते घेतल्याचाच हा परिणाम आहे. तर भाजपाची दूरदृष्टीदेखील यास कारणीभूत असून, भविष्यात महापालिकांवर कब्जा करण्यासाठी ही खेळी उपयुक्त ठरणार आहे.    विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवे...

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळासाहेब सानपांची अशी अवस्था का झाली?  संजय पाठक, नाशिक- नाशिक पूर्वमधील भाजपचे आमदार (राजीनामा दिल्याने आता माजी) बाळासाहेब सानप हे खरे तर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उजवा हात. महाजन यांच्यापर्यंत पोहोचायचे असेल तर सानप हे महत्त्वाचे तद्वतच पालकमंत्र्यांना काहीही निर्णय घ्यायचा तर त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक विश्वासू म्हणजेच बाळासाहेब सानप अशी अवस्था होती. मात्र, दीड-दोनवर्षांपूर्वी हे चित्र बदलले, सानप यांच्याविरोधातील तक्रारी वाढल्या आणि त्याची परिणीती सानप यांना उमेदवारी डावलण्यात झाली. हे खरे असले तरी त्याचे पडसाद ज्या पद्धतीने पडलेत हे अधिक धक्कादायक झाले. यशोशिखरावर असलेल्या आणि मंत्रिपदाचे दावेदार ठरणाºया सानप यांच्या घेतले गेलेल्या निर्णयामागे नक्की काय घडलं, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.       राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतात हे खरे असले तरी भाजपात केवळ उमेदवारी करण्याच्या दरम्यान, जे दोन ते तीन दिवस घडत होते ते कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे ठरले. नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत....

राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला ! संजय पाठक, नाशिक- ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढावायची त्या बिनीच्या शिलेदाराने शस्त्र गहाण टाकावी किंवा अगोदरच शत्रुपक्षाला जाऊन मिळावे अशी अवस्था नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्याबाबतीत झाली आहे. एकीकडे पक्षाकडे पुरसे उमेदवार नाही, त्यामुळे अन्य पक्षांकडील नाकारलेले स्वीकारण्याची वेळ आणि दुसरीकडे मात्र पक्षात ज्यांना सर्वेसर्वा केले त्यांनीच पळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. ज्या जिल्ह्यात पंधरा जागा लढवायची राज यांनी तयारी केली त्या जिल्ह्यात पंधरा पैकी पाच जागांवर उमेदवार मिळाले. त्यामुळे एकंदरच राज यांच्या नाशिकमधील करिष्मा कमी झाला की काय अशीच शंका निर्माण झाली आहे.          विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले. त्यातील पाच जण आगंतूक आहेत. उर्वरित जागांना अन्य पक्षांतील उमेदवारदेखील मिळाले नाहीत.    मनसे स्थापन करताना राज यांना सर्वाधिक साथ नाशिककरांनी दिली होती. राज यांच्या संपर्कातील शिवसेनेतील अन...

मनसेच्या माजी महापौरांनी माघार घेतल्याने राज यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा

मनसेच्या माजी महापौरांनी माघार घेतल्याने राज यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा संजय पाठक, नाशिक : राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे विरोधकांत सामील होण्याचे टाळले असले तरी त्यांचा कल राष्टÑवादीच्या बाजूनेच असल्याचे दिसते आहे. पुण्याकडे कोथरूड मतदारसंघात भाजपच्या विरोधात मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याची जी खेळी खेळली गेली तशी नाशिकमध्ये दोन ते तीन मतदारसंघात करण्याची संधीदेखील होती. मात्र, केवळ नाशिक पूर्व मतदार संघातूनच ती यशस्वी करण्यात आली. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी निवडणूक लढविण्याची आपली तयारीच नसल्याचे सांगत माघार घेतली, त्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या माघारीपेक्षा राज ठाकरे यांच्या राष्टÑवादीच्या सलगीचीच चर्चा जास्त होत आहे.     राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.  त्यामुळे मनसे कोणाशी फक्त सार्वत्रिक निवडणुकीत युती करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचे कारण म्हणजे २००९ मध्ये झालेल्या विधानसभा नि...